Ad will apear here
Next
‘एलआयसी’मध्ये आठ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती
मुंबई : तब्बल २४ वर्षांनंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मेगा भरती मोहीम जाहीर केली असून, आठ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

देशभरात ‘एलआयसी’च्या विविध कार्यालयांमध्ये ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षा ऑनलाइन होणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे इतकी असून, मागासवर्गीयांसाठी वयाची सवलत आहे. उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे. 

 महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी आदी ठिकाणी परीक्षा होणार आहे. इच्छुकांनी एक ऑक्टोबर २०१९ पर्यंत www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZUICE
Similar Posts
नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड मुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.
निवडणुकीसाठी चार हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध मुंबई : ‘विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची बुधवारी (९ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल झालेल्या पाच हजार ५४३ उमेदवारांपैकी चार हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
राज्यात गुलाबी थंडीचं आगमन मुंबई : बोचणारा गार वारा, धुक्यात हरवलेले रस्ते आणि नाक्या-नाक्यावर पेटणाऱ्या शेकोट्यांनी राज्यभरात थंडीची चाहूल लागल्याचे संकेत दिले आहेत. तापमानाचा किमान पारा १० अंशांवर उतरला असून, १३ नोव्हेंबरपर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकला (१०.२ अंश सेल्सिअस), तर सर्वाधिक तापमानाची नोंद रायगड जिल्ह्यातील भिरा येथे (३४
‘एलआयसी’चे प्रीमियम भरण्याची सुविधा आता ‘पेटीएम’वर मुंबई : भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या ‘पेटीएम’च्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ने भारतीय जीवनविमा निगम (एलआयसी) या देशातील सर्वांत मोठ्या जीवनविमा कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या मंचावरून ग्राहकांना आता काही सेकंदात ‘एलआयसी’चा हप्ता भरणे शक्य होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language